शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

FIH Women's Hockey World Cup : भारतीय महिलांना आव्हान राखण्यात यश, अमेरिकेला बरोबरीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 23:19 IST

भारतीय संघाने महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला 1-1 अशा बरोबरीत रोखले.

लंडन - भारतीय संघाने महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला 1-1 अशा बरोबरीत रोखले. या निकालासह भारतीय महिलांनी गोल सरासरीच्या जोरावर विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखले. 

भारतीय महिलांनी सुरूवात तर आत्मविश्वासाने केली, परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. पहिल्या सत्रातील 20 मिनिटांत मिळालेल्या चार पेनल्टी कॉर्नरवर भारतीय महिलांना गोल करता आला नाही. आक्रमणपटू नवनीत कौर पेनल्टी कॉर्नरवरून चेंडू इतक्या संथ गतीने पास करत होती, की अमेरिकेच्या गोलरक्षक जॅकी ब्रिग्जला चेंडूचा अंदाज बांधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता. पाय मुरगळल्यामुळे  तिस-याच मिनिटाला कर्णधार राणी रामपालला मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर भारताच्या आक्रमणाची धार बोथट झाली.

 

11 व्या मिनिटाला पॉलिनो मार्गोक्सने मैदानी गोल करून अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 15 व्या मिनिटाला राणी मैदानावर परतली. मात्र, पिछाडीवर पडलेल्या भारतीय खेळाडूंना पुनरागमन करता आलेच नाही. 18 व्या मिनिटाला उदिताने चालून आलेली संधी गमावली. गोलपोस्ट समोर असलेल्या उदीताला केवळ चेंडूला दिशा द्यायची होती आणि तेही तिला करता आले नाही. पहिल्या सत्रातील भारतीय महिलांचा खेळ आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने साजेसा झालेला नाही. गोलरक्षक सविताने पुन्हा एकदा काही अप्रतिम बचाव केले.आक्रमणातील ढिसाळपणा आणि समन्वयाचा अभाव यामुळे भारतीय खेळाडूंना पहिल्या सत्रात अनेक संधी मिळूनही गोल करता आलान नाही. अमेरिकेच्या खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू तंदुरूस्तीच्या बाबतीतही थकलेले जाणवत होते. मात्र दुस-या सत्रात भारतीय खेळाडू संपूर्ण ताकदीने खेळ केला. मध्यंतरानंतरच्या पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार राणी रामपालने तेज तर्रार हिट लगावत भारताला बरोबरीचा गोल मिळवून दिला. आघाडी मिळवल्यानंतर बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याचा अमेरिकेचा डाव फसला. भारतीय खेळाडूंनी अमेरिकेच्या D क्षेत्रात सातत्याने चढाई करून अमेरिकेच्या बचावपटूंना व्यग्र ठेवले. मध्यरक्षक मोनिका मलिकने आपली जबाबदारी चोख बजावली. तारा व्हिटेसेने बॅक फ्लिपवर गोल करण्याचा केलेला प्रयत्न सविताने सुरेख पद्धतीने अडवला. त्यामुळे 45 मिनिटांच्या खेळानंतर सामना 1-1 असा बरोबरीतच राहिला. अखेरच्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर राणीचा प्रयत्न यावेळी ब्रिग्जने अपयशी ठरवला. अखेरच्या सत्रात भारतीय महिलांकडून सातत्याने आक्रमणच झाले. 51व्या मिनिटाला निक्की प्रधानने आघाडीची संधी निर्माण केली, परंतु भारताला 1-1 अशा बरोबरीवरच समाधान मानावे लागले.  

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा