CoronaVirus News: भारतीय हॉकीपटू कोरोनातून सावरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 02:50 IST2020-08-18T02:50:23+5:302020-08-18T02:50:30+5:30
मनप्रीत सिंगसह भारतीय हॉकी संघातील सहा खेळाडू कोरोनामुक्त झाले असून सोमवारी सायंकाळी त्यांना बेंगळुरूच्या रुग्णालयातून रजा मिळाली.

CoronaVirus News: भारतीय हॉकीपटू कोरोनातून सावरले
नवी दिल्ली : कर्णधार मनप्रीत सिंगसह भारतीय हॉकी संघातील सहा खेळाडू कोरोनामुक्त झाले असून सोमवारी सायंकाळी त्यांना बेंगळुरूच्या रुग्णालयातून रजा मिळाली. संघातील सूत्राने सांगितले की, मनप्रीत, सुरेंदर कुमार, जसकरण सिंग, वरुण कुमार, कृष्ण बहादूर पाठक व मनदीप सिंग यांची कोरोना व्हायरस चाचणी दोनदा निगेटिव्ह आली.