शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

धोनीकडून प्रेरणा घेतो कर्णधार मनप्रीत सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:42 IST

मैदानावर संयम न गमाविण्याच्या प्रवृत्तीमुळे महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपटूच नव्हे, तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसाठीही प्रेरणास्रोत आहे.

नवी दिल्ली : मैदानावर संयम न गमाविण्याच्या प्रवृत्तीमुळे महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपटूच नव्हे, तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसाठीही प्रेरणास्रोत आहे. आॅलिम्पिक तयारीसाठी तो त्याच्याकडून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.मनप्रीत म्हणाला, ‘मी कर्णधार म्हणून धोनीकडून बरेच काही शिकतो. तो मैदानावर शांत असतो आणि अशावेळी निर्णय अचूक असतात. प्रत्येक खेळाडूसोबत चर्चा करतो आणि त्यांचे मनोधैर्य उंचावतो.’मनप्रीत पुढे म्हणाला, ‘मी ज्यावेळी हॉकी इंडिया लीगमध्ये रांचीसाठी खेळत होतो, त्यावेळी धोनी संघाचा सहमालक होता. त्याच्यासोबत चर्चा करणे आवडत होते. तो मैदानात आणि बाहेरही शांत असतो. कर्णधार शांतचित्त असेल तर बराच फायदा होतो. आक्रमकता आवश्यक आहे, पण चित्त शांत असणे आवश्यक आहे. त्याच्याप्रमाणे मैदानावर वर्तन असावे, यासाठी मी प्रयत्नशील असतो.’गेल्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये एफआयएच सिरिज फायनल जिंकत भारतीय हॉकी संघाने नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत स्थान मिळवले. भारतीय संघाचे लक्ष्य या स्पर्धेत विजय मिळवत पुढील वर्षी होणाºया टोकियो आॅलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्याचे आहे. सध्या भारतीय संघ बंगलोरमध्ये ७ जुलैपासून १२ आॅगस्टपर्यंत आयोजित सराव शिबिरात सहभागी झाला आहे.भारतीय हॉकी संघाने क्रिकेट विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने बघितले आणि मनप्रीतच्या मते, जेतेपद पटकावणे हेच संघाच्या श्रेष्ठतेचा निकष असायला नको.मनप्रीत म्हणाला, ‘क्रिकेटही एक खेळ अहे. प्रत्येक खेळात चढ-उतार येत असतो. कुठलाही संघ पराभूत होण्यासाठी खेळत नाही. आमच्या संघानेही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि साखळी फेरीत अव्वल स्थानी राहिला. एक दिवस कुणाचाही वाईट राहू शकतो. हॉकीमध्येही असे घडते आणि त्यावेळी कसे वाटते, याची आम्हाला कल्पना आहे. संघाला आपल्या पाठिंब्याची गरज असते.’आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या तयारीबाबत विचारले असता मनप्रीत म्हणाला, ‘आम्ही आॅगस्टमध्ये जपानच्या दौºयावर जाणार आहोत आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये हॉलंड आणि बेल्जियमसोबत खेळू. गेल्या काही दिवसांमध्ये स्ट्रायकर, गोलकीपर व डिफेन्डर यांच्यासाठी वेगवेगळे शिबिर झाले. त्याचा लाभही झाला.’>प्रशिक्षकांचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे आम्ही आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळो किंवा आमच्या तुलनेत खालचे मानांकन असलेल्या संघाविरुद्ध खेळो, पण मानसिकता एकसारखी असायला हवी. आॅस्ट्रेलियाविरुद्ध ज्या उत्साहाने खेळता तोच उत्साह अन्य संघांविरुद्ध खेळतानाही कायम असायला हवा. चुका हा खेळाचा एक भाग आहे, पण त्यानंतरची कृती महत्त्वाची आहे. चुका सर्वच करतात, पण त्यावर विचार करत न राहता आगेकूच करणे आवश्यक आहे. सामन्यात चुका होतील, पण वेगाने पुनरागमन करणे गरजेचे आहे. - मनप्रीत सिंग

टॅग्स :Hockeyहॉकी