शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॉकी विश्वचषक जेतेपदाच्या हॅट्ट्रिकवर आॅस्ट्रेलियाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 6:58 AM

ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज असलेला गतविजेता आॅस्ट्रेलिया यंदाच्या हॉकी विश्वचषकात जेतेपद मिळवून हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने भारतात दाखल झाला आहे.

भुवनेश्वर : ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज असलेला गतविजेता आॅस्ट्रेलिया यंदाच्या हॉकी विश्वचषकात जेतेपद मिळवून हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने भारतात दाखल झाला आहे. असे झाल्यास २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकपर्यंत सरकारकडून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणे कायम राहील.

आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक कोलिन बॅच यांच्यामते विश्वचषकात संघाची कामगिरी ढेपाळल्यास आॅलिम्पिकची तयारी प्रभावित होईल. अशावेळी सरकारकडून अतिरिक्त आर्थिक साहाय्य रोखले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय संघाच्या शानदार कामगिरीमुळे आॅस्ट्रेलियाच्या सरकारने हॉकीला २०२० पर्यंत अतिरिक्त आर्थिक साहाय्य देणे सुरू ठेवले आहे. आॅस्ट्रेलियाने २०१० आणि २०१४ मध्ये विश्वचषक आणि यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे देखील सुवर्ण जिंकले आहे.

शुक्रवारी कलिंग स्टेडियमवर आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक बॅच म्हणाले,‘कामगिरी चांगली राहिली तरच आम्हाला आर्थिक पाठबळ सुरू राहील. २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकपर्यंत सरकारकडून पाठबळ मिळत राहील, अशी आशा आहे. एखाद्या स्पर्धेत लवकर बाहेर पडलो तर त्याचा थेट प्रभाव पैसा मिळण्यावर पडतो. त्यामुळेच येथे चांगली कामगिरी करीत जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याचे लक्ष्य आखले आहे.’ ‘सर्वोत्तम संघात भारत’भारतीय हॉकीबद्दल बॅच म्हणाले, ‘भारताविरुद्ध आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान खेळले होतो. त्यानंतर भारताने खेळात प्रगती साधली आहे. सर्वोत्कृष्ट संघांमध्ये भारताची गणना होत असल्याने येथे यजमान संघ चांगल्या कामगिरीच्या निर्धारानेच खेळणार आहे. त्यांच्यावर दडपणदेखील असेल. विश्व हॉकीत सर्वच संघ भारताचा मोठा आदर बाळगतात.’

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक