शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अझलन शाह हॉकी : भारताने घालवली विजयाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:33 IST

अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा लाभ घेत पेनल्टी स्ट्रोकवर गोल करणा-या इंग्लंडने सामन्यात बरोबरी साधली.

इपोह - अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा लाभ घेत पेनल्टी स्ट्रोकवर गोल करणाºया इंग्लंडने सामन्यात बरोबरी साधली.या सामन्यात भारताने तब्बल नऊ पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. पेनल्टी कॉर्नर वाया घालविले, हे भारताचा आजचा विजय हुकल्याचे कारण ठरले. इंग्लंडविरुद्ध सामन्यातही भारताच्या युवा खेळाडूंनी आश्वासक खेळ केला. रमणदीप सिंग, तलविंदर सिंग, सुमीत कुमार यांनी पहिल्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवले. आघाडीच्या फळीने वारंवार हल्ले चढवीत इंग्लंडवर दडपण आणले. पहिल्या सत्राच्या अखेरीस रमणदीप सिंग आणि तलविंदर सिंग यांच्या पासवर नवोदित शीलानंद लाक्राने गोल नोंदवीत आघाडी मिळवून दिली. रूपिंदरपाल आणि हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत खेळणाºया भारताचे ड्रॅगफ्लिकिंग अचूक नव्हते.मध्यंतरापर्यंत भारताला तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र एकावरही गोल होऊ शकला नाही. तिसºया सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला; मात्र भारताच्या बचावफळीने भक्कम बचाव करीत इंग्लंडच्या खेळाडूंचे मनसुबे हाणून पाडले.भारतीय खेळाडूंची सामन्यावरील पकड पाहता, २७ व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारत पहिला विजय नोंदविणार असे चित्र असताना, अखेरच्या पाच मिनिटात पंचांनी इंग्लंडला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. याचा फायदा घेत इंग्लंडच्या मार्क ग्लेघोरीननेगोल नोंदवीत इंग्लंडला बरोबरीसाधून दिली. सोमवारच्या विश्रांतीनंतर भारताला नंबर वन आॅस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी सामना खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत