शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात तरुणीची हत्या, मृतदेह औंढ्यात फेकला; मॉलच्या बिलाने आरोपी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:03 IST

मृत युवतीचे गूढ अखेर उलगडले; आरोपी ताब्यात

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : अज्ञात युवतीच्या मृतदेहाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. सदर मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील युवती अलका बाजीराव बेद्रे हिचा असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले. मुगट (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील रहिवासी असलेल्या हत्येच्या आरोपीस तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून ताब्यात घेण्यात आले.

२४ डिसेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडीजवळ वन विभागाच्या जंगलात एका अज्ञात युवतीचा मृतदेह आढळून आला. शव विच्छेदनानंतर युवतीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने औंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी कोणताही पुरावा आढळून आला नसल्यामुळे पोलिसांसमोर प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. सतत चार दिवस ओळख पटविण्यासाठी तिचे छायाचित्र घेऊन स्थानिक गुन्हा शाखा व औंढा पोलिसांचे पथक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तपास करीत होते. परंतु मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले नाही. शेवटी पुन्हा घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली असता, घटनास्थळापासून काही अंतरावर एक मोठी बॅग व संभाजीनगर येथील एका मॉलचे बिल मिळून आले. त्याआधारे तपासाची दिशा निश्चित करून तपास सुरू करण्यात आला.

याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले व सदर मृत युवती ही जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे एक पथक २९ डिसेंबर रोजी जामखेड येथील मृत महिलेच्या घरी जाऊन छायाचित्र दाखविले असता सदर मृतदेह हा अलका बाजीराव बेद्रे हिचा असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीवरून समांतर तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेने आरोपीचा शोध लावत मुगट (जि. नांदेड) येथील रहिवासी असलेल्या श्रीकांत सुरेश पिनलवार यास हत्येच्या आरोपाखाली आदिलाबाद येथून ताब्यात घेतले.

सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे, शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, माधव जिव्हारे, कपिल आगलावे, अंमलदार पांडुरंग राठोड, कोंडिबा मगरे, विक्रम कुंदनानी, गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, दत्ता नागरे, आकाश टापरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इमरान सिद्दिकी, इकबाल शेख, मदार शेख आदींनी केली.

असा घडला गुन्हासदाफुले वस्ती जामखेड येथील अलका बाजीराव बेद्रे (वय २९) हिची मुगट (जि. नांदेड) येथील तरुणाशी काही काळापूर्वी प्रवासादरम्यान भेट झाली. भेटीतून मोबाइल नंबरची घेवाण- देवाण झाली. पुढे प्रेमसंबंध निर्माण होऊन गत नऊ महिन्यांपासून दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे काही महिने चांगले व्यवस्थित राहिल्यानंतर श्रीकांत हा अलकाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले. दरम्यान, वारंवार वाद होत असल्याने तिने दुसऱ्याशी सलगी वाढविली. याचा राग मनात धरून श्रीकांतने २३ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर परिसरातील लाडगाव येथील भाड्याच्या रूममध्ये रात्री अलका हिचा गळा दाबून खून केला. मृतदेह एका प्रवासी वाहनाने औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी शिवारात आणून टाकला. याप्रकरणी आरोपी श्रीकांतला ताब्यात घेण्यात आले असून, सदर हत्या प्रकरणात आणखी कितीजण सहभागी होते, मृतदेह नेमका कोणत्या वाहनात आणण्यात आला आदी तपास औंढा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू