गावच्या विकासासाठी तरूणांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:10+5:302021-05-07T04:31:10+5:30
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नुकतेच ऑनलाइन व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. इतिहास ...

गावच्या विकासासाठी तरूणांनी एकत्र यावे
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नुकतेच ऑनलाइन व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. इतिहास प्रबोधन संस्था व शिवजन्मोत्सव महोत्सव समिती साळवा यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागोराव करंडे तर अध्यक्ष म्हणून पाचोरा (जि. जळगाव) येथील इतिहास प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरभी जोशी व शिवराज इंद्रे यांनी केले. प्रास्ताविक गणपत माखणे यांनी केले. आभार डॉ. महेश कोंडावार यांनी मानले. दरम्यान, ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात प्राचार्य नारायण करंडे, माजी मुख्याध्यापक रामराव करंडे, पोलिस कर्मचारी दत्ता शिंदे, शाळा समिती अध्यक्ष शंकर औटे, सहशिक्षक जनार्दन मोरे, जयस्वाल, मंगेश माखणे, तेजस माखणे, ज्ञानबा माखणे, विश्वंभर करंडे, यशश्री कोचिंग क्लासेसचे संचालक शंकर माखणे, पंकज करंडे, सचिन माखणे आदी सहभागी झाले होते.
फोटो :