तरुण नेतृत्वामुळे वसमतच्या तरुणाईला दिशा मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:26+5:302021-02-05T07:56:26+5:30
वसमत : येथे राज्यस्तरीय क्रीडा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन ना. नवाब मलिक यांच्या हस्ते २६ ...

तरुण नेतृत्वामुळे वसमतच्या तरुणाईला दिशा मिळेल
वसमत : येथे राज्यस्तरीय क्रीडा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन ना. नवाब मलिक यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी वसमत येथे तरुणांची मोठी शक्ती असून येथील क्रीडा स्पर्धा राज्यात प्रसिद्ध होत आहेत. वसमतकरांना तरुण आमदार लाभला आहे. या तरुण नेतृत्वामुळे तरुणाईला दिशा मिळेल व तरुणांचा निश्चित विकास होईल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
वसमत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. राजू नवघरे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, दिलीप चव्हाण अंबादासराव भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आ. राजू नवघरे यांनी प्रास्ताविकात वसमत येथील खेळाडूंच्या कर्तबगारीचा आलेख मांडला. येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकल्याचेही त्यांनी सांगितले. खेळाडूंच्या विकासासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत, खेळाडू वृत्तीने खेळ खेळला गेला पाहिजे असे आवाहन केले.
आ. नवघरे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी दिलीप भोसले, शेख अय्युब, छोटे मिया, नगरसेवक शेख मोहसीन, रशीद जानीमिया, अमजद खान, मसूद शरीफ, मनोज भालेराव, इरफान सिद्दिकी, मोहम्मद साजिद, शेख नवीद अहमद रिजवान खान सलमान खान, शेख तालेब, कासिम पापुलर, मोहसीन खान आदींनी परिश्रम घेतले. फाेटाे नं. ३१