नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:32 IST2019-07-11T16:30:51+5:302019-07-11T16:32:46+5:30
नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
आडगाव रंजे (हिंगोली ) : वसमत तालुक्यातील परळी दशरथे येथील एका तरुण शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून बुधवारी (दि. १०) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
वसमत तालुक्यातील परळी येथील तरुण शेतकरी रामेश्वर देवराव दशरथे (१८) या तरुण शेतकऱ्यानी नापिकीला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या शेतकऱ्याला फक्त सव्वा एकर जमीन आहे. तसेच वडील नसून आई आहे सदरील तरुणांनी तीन बहिणींचे लग्न केले आहेत. नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सदरील शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची फिर्याद माणिकराव लक्ष्मणराव दशरथे रा.परळी यांनी हट्टा पोलीस ठाण्यात दिली असून याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बबन राठोड करीत आहेत.