शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

यंदाही नागनाथ मंदिरात घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:09 AM

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औंढा येथील श्री नागनाथ मंदिरात शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट मंदिरात घुसल्याने पहाटे मंदिरात सर्वत्र घाण निर्माण झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औंढा येथील श्री नागनाथ मंदिरात शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट मंदिरात घुसल्याने पहाटे मंदिरात सर्वत्र घाण निर्माण झाली होती. तर सोनार गल्लीतील काही जणांच्या घरातही पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केली असून, नगरपंचायतीच्या वतीने यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास तालुक्यात सर्वत्र पावसाला सुरूवात झाली. काही तासांच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मुसळधार पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले होते. सर्वच प्रभागातून वाहणारे पाणी सोनार गल्ली, नगरपंचायत रोड व बसस्थानक परिसरात थेट औंढा तलावातील सांडव्यात वाहून जाते. शहरात सध्या नव्याने सिमेंट रस्ते झाल्याने त्यांची उंची वाढली असल्याने रस्त्यावरून वाहने पाणी थेट सोनार गल्लीतील विश्वनाथ पटवे त्याचप्रमाणे महामुने यांच्या दुकानात शिरले.येहळेगावात पंचनामे करण्याच्या सूचनाऔंढा नागनाथ : शनिवारी रात्री झालेल्या पावसात येहळेगाव सोळंके येथील १२ शेतकऱ्यांची लागवड केलेली हळद पावसामुळे वाहून गेली आहे. यावेळी आ.डॉ. संतोष टारफे यांनी पीडित शेतकºयांची भेट घेऊन पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्या आहेत. येहळेगाव सर्कलमध्ये १५२ मिमी पावसाची नोंद झाली. या भागातील ओढे, नाले तुडूंब भरून वाहत होते. पाण्याला जायला जागाच मिळाली नसल्याने ते पाणी थेट शेतांनी घुसले. मे महिन्यात लागवड केलेली हळद अक्षरश: वाहून गेली आहे. यामध्ये नारायण सोळंके, माधव सोळंके, शाहुराव सोळंके, सचिन सोळंके, स्वप्नील सोळंके, संतोष सोळंके, जयश्री सोळंके, देविदास सोळंके, सुनिता सोळंके, सतीश सोळंके, संजय सोळंके शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. आ.डॉ. संतोष टारफे, सरपंच गजानन सोळंके, भुजंग सोळंके, शाहुराव महाराज यांनी नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये शेतकºयांचे ठिबक संचही वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.गावातील जुनी वेस पाडली असल्याने पाण्याचा अडथळा निर्माण झाला नाही. त्यामुळे गावातून येणारे पुराचे पाणी मंदिराच्या प्रवेशद्वारातून थेट मंदिरात घुसले. प्लास्टिकच्या पिशव्या, मातीमिश्रीत गाळ या ठिकाणी आल्याने मातीचा थर निर्माण झाला आहे. नेमका प्रवेशद्वारातच हा प्रकार घडल्यानेभाविकांना मुख्य रस्त्याऐवजी पर्यायी वापर करावा लागला. सफाईस मंदिर प्रशासनाला ४ तास लागले. मागील दोन वर्षांपासून पाणी मंदिरात घुसण्याचे प्रकार वाढले असून नगरपंचायतीने याबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी भाविकांतून होत आहे.वारंवार उद्भवणाºया या समस्येमुळे शासनाकडून आलेल्या १२ कोटी रुपयांच्या निधीतून सर्वप्रथम मंदिरात येणाºया पाण्याचा निपटारा करावा अशी मागणी विश्वस्थांच्या वतीनेदेखील केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीTempleमंदिर