वसमतमध्ये यमराज उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:50+5:302021-02-05T07:53:50+5:30

वसमत : येथे रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या वतीने फेरी काढण्यात आली. या फेरीत चक्क यमराजांनी नागरिकांना ...

Yamaraj took to the streets in Wasmat | वसमतमध्ये यमराज उतरले रस्त्यावर

वसमतमध्ये यमराज उतरले रस्त्यावर

वसमत : येथे रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या वतीने फेरी काढण्यात आली. या फेरीत चक्क यमराजांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत नियम न पाळल्यास माझ्याशी गाठ आहे, याची आठवण करून दिली.

वसमत पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. रस्ता सुरक्षिततेची माहिती देणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता. या चित्ररथ फेरीचे उद्घाटन तहसीलदार अरविंद बोळांगे, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सीताराम म्यानेवार आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी हेल्मेटसह दुचाकी फेरी काढली. यावेळी यमराजांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. चौकाचौकात नागरिकांना सुरक्षिततेचे नियम पाळा, अपघात टाळा, हेल्मेट वापरा, इंधनाची बचत करा, असे आवाहन करत वाहतुकीचे नियम न पाळल्यास माझ्या भेटीला यावे लागेल, असे आवाहनही यमराज करत होते.

रस्ता सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी आगळावेगळा प्रयोग केला. त्याची दिवसभर चर्चा शहरात होती. पोलीस निरीक्षक शिवाजीराव गुरमे यांच्या पुढाकाराने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Yamaraj took to the streets in Wasmat