शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक ! पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखले, खेड्यात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:39 IST

सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.

हिंगोली : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईनच्या समन्वयाने जिल्ह्यात पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षणदेखील पूर्ण होत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते आणि पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो. लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडावे लागत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु समाजातील जागरुक नागरिक व ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईन (१०९८) या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात आले. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे १, हिंगोली तालुक्यातील कारवाडी येथे १, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे २ आणि वसमत तालुक्यातील पिंपळा (चौरे) येथे १ यांचा समावेश आहे.

बालविवाह रोखण्यासाठी बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, कायदा व परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, रामप्रसाद मुडे व ग्रावसेवक, ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने संबंधित बालिका व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाह रोखण्यात यश आले.

तर येथे संपर्क साधावा...सध्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वयाचा विचार करता बालविवाह होत आहेत. मुलींच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना बालविवाहास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. गावात अथवा इतर कोणत्याही ठिकाणी बालविवाह होत असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अथवा चाईल्ड लाईन (१०९८) या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील कोणताही नागरिक तसेच स्वत: बालक किंवा बालिका व स्वयंसेवी संस्थेने बालविवाह होत असल्यास किंवा बालकांसोबत गैरकृत्य होत असल्यास चाईल्ड लाईनकडे संपर्क साधावा.- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, हिंगोली

टॅग्स :marriageलग्नHingoliहिंगोली