मजुरांना कामाचा मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST2021-02-15T04:26:19+5:302021-02-15T04:26:19+5:30

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे रोहयो योजनेअंतर्गत मजुरांनी सिंचन विहिरींची कामे केली आहेत. परंतु, अद्याप कामाचा मोबदला मिळाला ...

The workers did not get paid for their work | मजुरांना कामाचा मोबदला मिळेना

मजुरांना कामाचा मोबदला मिळेना

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे रोहयो योजनेअंतर्गत मजुरांनी सिंचन विहिरींची कामे केली आहेत. परंतु, अद्याप कामाचा मोबदला मिळाला नाही. केलेल्या कामाचा मोबदला मिळावा, अशी मागणी लाभार्थींनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भाटेगाव येथील पाच लाभधारकांनी सिंचन विहिरींची कामे केली आहेत. परंतु, मजुरांच्या मस्टरवर ग्रामसेवक सही करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे लाभार्थींनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना ५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कामाचे पैसे मिळत नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कामाचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशाही निवेदनातून दिला आहे. निवेदनावर विजय राठोड, सुषमा राठोड, कासूबाई चव्हाण, प्रकाश राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: The workers did not get paid for their work