सदर बाजार रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST2021-03-05T04:29:54+5:302021-03-05T04:29:54+5:30

रस्ते विकास प्रकल्पात शहरातील सदर बाजार रस्ता मंजूर झाला आहे. हा रस्ता नऊ मीटर मंजूर असताना पालिकेने मात्र आराखड्याप्रमाणे ...

Work on this market road started | सदर बाजार रस्त्याचे काम सुरू

सदर बाजार रस्त्याचे काम सुरू

रस्ते विकास प्रकल्पात शहरातील सदर बाजार रस्ता मंजूर झाला आहे. हा रस्ता नऊ मीटर मंजूर असताना पालिकेने मात्र आराखड्याप्रमाणे १२ मीटर रस्ता बनवण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या नगर रचना व बांधकाम विभागाने संयुक्तपणे मोजणी करून या रस्त्यावरील अनेक मालमत्तांवर खुणा केल्या होत्या. त्यामुळे या खुणांपर्यंत बांधकाम पडणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे या भागातील नागरिक अस्वस्थ होते. अनेकांनी याबाबत नगरपालिकेला विचारणा करून पदाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी मांडली होती. त्यामुळे नगरपालिकेला अचानक हा रस्ता ९ मीटरचाच मंजूर असल्याचे लक्षात आले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आज या भागात रस्त्याची साफसफाई करून कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. शिवाय काही जणांची ओटे व पायऱ्यांची अतिक्रमणेही काढून घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी हे अतिक्रमण काढून घेतले. आता हा रस्ता सुधारित अंदाजपत्रक मंजूर झाले तर १२ मीटरचा होणार आहे. अन्यथा आहे ते काम पूर्ण करण्याशिवाय पालिकेला गत्यंतर नाही. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका पाहता सुधारित अंदाजपत्रकाच्या झंझटीत पालिका पडेल, असे चित्र तर नाही.

पार्किंगसाठी पिवळे पट्टे

हिंगोली शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत झालेल्या रस्त्यावर पिवळे पट्टे मारण्यात येत आहेत. पार्किंगसाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. या कामाचा प्रारंभ नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजीत खुराणा, नगर अभियंता रत्नाकर अडिसरे व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. मागील अनेक दिवसांपासून शहरात पार्किंगच्या खुणा नसल्याने वाहनधारकांना दंडाचा फटका सोसावा लागत होता. आता या प्रकल्पातील रस्त्यांवर तरी किमान यातून नागरिकांचा बचाव होणार आहे.

Web Title: Work on this market road started