Women try to kill poisonous fluid; Filed the complaint | महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे शेताच्या कामावर का येत नाहीस म्हणून एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजण्यात आले होते. ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील फियार्दीची पत्नी सौ वनिता संतोष राठोड (३२) यास आरोपींनी संगनमत करून तू आमच्या शेताच्या कामावर का येत नाहीस तुज्या मुलीला पण का पाठवत नाहीस असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून लाथा-बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत वनिता राठोड यांना विषारी द्रव्य पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर घटना १ जानेवारी रोजी ८ वाजेच्या सुमारास घडली.
वनिता राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वसमत व नांदेड येथे उपचार करून मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. भोईवाडा पोलीस ठाणे मुंबई येथून फिर्यादीचा जवाब कुरुंदा ठाण्यात पाठविण्यात आला. फिर्यादी संतोष राठोड याच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी रंगनाथ चव्हाण, कासुबाई चव्हाण, विनोद चव्हाण, वंदना चव्हाण, आशाबाई चव्हाण, सर्व रा. लक्ष्मणनाईक तांडा यांच्याविरुद्ध विविध कमलान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी डीवायएसपी भरत मुदीराज, सपोनि शंकर वाघमोडे, बीट जमादार अशोक कांबळे, फकरोदीन सिद्दिकी, आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. तपास सपोनि शंकर वाघमोडे हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपीची शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Women try to kill poisonous fluid; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.