महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील गंठण पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:17+5:302021-05-07T04:31:17+5:30
वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंबिका बापूजी पिटलेवाड या ५ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात ...

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील गंठण पळविले
वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंबिका बापूजी पिटलेवाड या ५ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होत्या. त्यांची दुचाकी महामार्गावरील हीराेहोंडा एजन्सीसमोर आली असता, एम.एच. ३८ एस १६७२ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चाेरून नेले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पिटलेवाड घाबरून गेल्या. त्यांनी वसमत शहर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.
त्यानंतर वसमत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक खार्डे, जमादार प्रशांत मुंडे, मगरे यांच्या पथकाने दुचाकीस्वाराचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत दुचाकीस्वाराची माहिती मिळाली नाही. त्यानंतर ६ मे च्या पहाटे पिटलेवाड यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, विठ्ठल काळे, भगवान आडे, विलास सोनवणे यांच्या पथकाने दुचाकीस्वाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.