विनापरवानगीने लावले लग्न; वधू-वर, भडजी, बँड पथकासह ७० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 19:10 IST2021-03-17T19:06:32+5:302021-03-17T19:10:04+5:30
लग्नसमारंभ साजरा केल्यावरून वधू - वर मंडळी, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, बँड पथक, भटजी व जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवानगीने लावले लग्न; वधू-वर, भडजी, बँड पथकासह ७० जणांवर गुन्हा दाखल
कळमनुरी (जि. हिंगोली) : लग्नासाठी परवानगी न काढता १६ मार्च रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा गावात लग्न लावून दिल्याची घटना घडली. यामध्ये वधू - वरासह ७० जणांविरुद्ध कळमनुरी पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काेराेना संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विविध कार्यक्रम व समारंभासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र यादरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथे विनापरवानगीने लग्न नियाेजित केले, तसेच सामाजिक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी तलाठी अशोक चंडके यांच्या फिर्यादीवरून दयानंद सावळे, दौलतराव सावळे, संजय सावळे, उमराव सावळे, पांडुरंग सावळे, सुभाष सावळे, मारोती सावळे, प्रल्हाद काळपे, दत्तराव सावळे, प्रकाश सावळे, सीताराम सावळे, थोरात, शिवाजी थोरात, संतोष थोरात, सुभाष थोरात, सारंग थोरात, मारोती फासगे, कुंडलिक सरकटे, बालाजी डोरले, गजानन सावळे, देवीदास पांडे, दत्तराव सावळे, पंजाब कावरखे, गणेश सावळे, बँड पथकातील ७ ते ८ जण व इतर ७० ते ८० जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वधू - वर मंडळी, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, बँड पथक, भटजी व जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.