वळण रस्ते बनले खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:20+5:302020-12-25T04:24:20+5:30

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच हिंगोली: शहरातील गांधी चौक, महावीर चौक, बसस्थानक परिसर, वाशीम रोड आदी भागात विरुद्ध दिशेने वाहतूक ...

The winding roads became rocky | वळण रस्ते बनले खड्डेमय

वळण रस्ते बनले खड्डेमय

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच

हिंगोली: शहरातील गांधी चौक, महावीर चौक, बसस्थानक परिसर, वाशीम रोड आदी भागात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे.

बसस्थाकात धुळीचे प्रमाण वाढले

हिंगोली: मागील काही दिवसांपासून बसस्थानकात धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बसस्थानकातील धूळ कमी करण्यासाठी बसस्थानक प्रशासनाने साफसफाई करुन सकाळ आणि सायंकाळच्यावेळी बसस्थानकात परिसरात पाणी टाकावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

नाल्यांवर औषध फवारणी करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील जिजामातानगर, गंगानगर, खटकळी परिसर, पेन्शनपुरा आदी भागाधील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागात स्वच्छता मोहीम राबवून नाल्यावर औषध फवारणी करावी, अशी

मागणी होत आहे.

अंतर्गत रस्त्यांची दुरवस्थाहिंगोली: शहरातील नाईकनगर, देवडानगर, रेल्वेस्टेशन परिसर आदी भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची करत करावी लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घेऊन अंतर्गत रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे.

कळमनुरी तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु

कळमनुरी: शहरासह परिसरातील वीजपुरवठा मागील काही दिवसांपासून खंडित होत आहे. काही ठिकाणी तर भारनियमनाव्यतिरिक्त वीज खंडित होत आहे. यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद पडत आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

कळमनुरीत शहात वाहने अस्ताव्यस्त

कळमनुरी: शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. मुख्य रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने कुठेही उभी केली जात आहेत. शहर वाहतूक शखेने याची दखल घेऊन कळमुनरी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शिवारात तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये अतिवृष्टीने सोयाबीन, कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. तूर चांगली येईल, अशी आशा होती. परंतु, तुरीवरही अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: The winding roads became rocky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.