शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे. ...

पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे. मागील वर्षभरापासून हे काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच शेतीपयोगी साहित्य शेतात नेण्यासाठी या पुलाच्या अपूर्ण कामामुळे मोठा त्रास होत आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

हिंगोली : आदर्श कॉलेजजवळील पाण्याच्या टाकीपासून शाहुनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता उताराचा असून, अनेक वाहने याठिकाणाहून वेगाने धावत असतात. पण, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना चुकविताना अनेक वाहनधारक पडत असल्याचे प्रकार घडले आहेत. यासाठी हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरवासियांसह वाहनधारकांतून होत आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित

औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. गावाचा वीजपुरवठा दोन महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. गावातील वीज खंडित राहात असल्याने गावकऱ्यांत महावितरणच्या कारभाराविषयी रोष निर्माण होत आहे. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेकांची वीज उपकरणेही जळाली आहेत. यामुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

आंबाचोंडी : कोरोना या महामारीमुळे हिंगोली रेल्वे स्थानकातील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. आता भारतातील सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी कोरोनामुळे बंद करण्यात आलेली ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. पॅसेंजर रेल्वेच्या तिकिटाच्या तुलनेत बस व इतर वाहनांचा खर्च जास्त असून, हा सामान्य नागरिकांना परवडत नाही. यासाठी ही सेवा जलदगतीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

रस्ता दुरूस्तीची मागणी

पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील चार महिन्यांपासून हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. यासाठी हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

वातावरण बदलामुळे रुग्ण संख्या वाढली

वसमत : मागील दोन दिवसांपासून अचानक ढगाळ वातावरण झाले आहे. या वातावरण बदलामुळे बालक आणि वयाेवृद्ध ग्रासले गेले आहेत. बालकांना ताप, हिवताप, खोकला, सर्दी तर वयोवृद्धांना दमा, अंगदुखी, डोकेदुखी असे रोग होत आहेत. वातावरण बदलामुळे तालुक्यातील अनेक रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत.

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : सध्या तालुक्यातील रोहयोचे काम सुरू नसल्यामुळे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह कामाच्या शोधात परगावी जात आहेत. तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मजूर वर्गाचा ताफा परगावी जात असल्याचे दिसत आहे.