बेवारस स्थितीतील वाहनांचा मालक कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST2021-03-13T04:54:16+5:302021-03-13T04:54:16+5:30
हिंगोली : शहरातील काही रस्ते, मोकळ्या, मालकीच्या जागेवर नादुरूस्त, कालबाह्य झालेली तसेच अपघातग्रस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र ...

बेवारस स्थितीतील वाहनांचा मालक कोण?
हिंगोली : शहरातील काही रस्ते, मोकळ्या, मालकीच्या जागेवर नादुरूस्त, कालबाह्य झालेली तसेच अपघातग्रस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र आहे. ही वाहने कोणाच्या तरी मालकीची असली तरी अनेक दिवस एकाच जागेवर उभी राहत असल्याने अशा वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी वाहने कोणाच्या मालकीची आहेत, याचा शोध घेऊन वाहनमालकांना सूचना देणे गरजेचे बनले आहे.
देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली बेवारस कार आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे बेवारस वाहने पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. कालबाह्य, नादुरूस्त तसेच अपघातग्रस्त वाहने शहरातील मोकळ्या जागेवर तसेच मालकीच्या जागेवर उभी
असल्याचे चित्र काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. मात्र शहरातील मोकळ्या जागेवर, कोणाच्या तरी मालकीच्या जागेवर नादुरूस्त, कालबाह्य वाहने उभी असल्याचे दिसून येत आहेत. ही वाहने एकाच जागेवर अनेक दिवसांपासून उभी दिसत असल्याने अशा वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बेवारसस्थितीत असणाऱ्या नादुरूस्त, कालबाह्य, अपघातग्रस्त वाहनांचा शोध घेऊन अशा वाहनांचा गैरवापर होणार नाही, यासंदर्भात सूचना देणे गरजेचे बनले आहे.
प्रतिक्रीया
शहरातील काही मोकळ्या जागेवर वाहने उभी केली जात आहेत. अनेक दिवस ही वाहने एकाच ठिकाणी उभी राहत असल्याने अशा वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांचा शोध घेऊन वाहनमालकांना सूचना देणे गरजेचे आहे.
-मनिष नागरे
शहरातील काही मार्गावर एखादे तरी नादुरूस्त वाहन उभे असते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण
होत आहे. अशा वाहनांवर ठोस कारवाईही होत नसल्याने रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
-निखील भगत
शहरात बेवारसस्थितीत वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा तर दोन दोन दिवस वाहने रस्त्याच्या कडेलाही उभी असलेली आढळून येतात. यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
-हरिष पुंडगे
पालिका प्रशासन काय म्हणते?
-शहरातील रस्त्यांवर उभी असणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. पार्कींगसाठी शहरातील रस्त्यांवर पिवळे पट्टे ओढले आहेत. तसेच गांधीपार्क व खुराणा पेट्रोलपंप भागात पार्कींगसाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली.
पोलीस अधिकारी काय म्हणतात?
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास अशा वाहनांवर कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार यांनी सांगितले. फाेटाे नं. ०९ व १०