शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

२२०० मदतनीसांना मानधन मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:41 AM

जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शासनाकडून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केला जातो. शिवाय तशी तरतूदही आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या महत्त्वपूर्ण योजनेला ग्रहण लागले आहे. कधी तांदूळ वाटपात दिरंगाई तर कधी धान्यादी माल तसेच मदतनिसांचे मानधन रखडते. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून मदतनिसांना १ हजार रूपयांप्रमाणे दिले जाणारे मानधन, इंधन व भाजीपाल्याचा निधी अद्याप संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला नाही. तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया मदतनीस मानधनापासून वंचित आहेत. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही. शासन दरबारी मानधन देण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देत नाहीत. तर संबंधित विभागातील कर्मचारी तर याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे मानधन न मिळण्याचे कारण अद्याप तरी उघडकीस आले नाही. सध्या मदतनिसांचे मानधन बँक खात्यावर जमा करण्यासाठी याद्यांची प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यातील जि. प. च्या १ हजार ३२ शाळांमधून जवळपास १ लाख ६३ हजार, पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु या स्वयंपाकी मदतनिसांना मात्र अद्याप मानधनच न मिळाले नाही. मदतनिसांचे मानधन व इंधन-भाजीपाला यासाठी एकूण २ कोटीं ३२ लाख ८७ हजार ४५३ रूपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. मात्र सदर रक्कम अद्याप बँकेत वर्ग झाली नाही. रक्कम वर्ग न होण्याचे कारण म्हणजे शिक्षण विभागातील शापोआ यंत्रणेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचे स्वयंपाकी, मदतनिसांच्या संघटेनेतर्फे सांगितले जात आहे.या महिन्यांपासून रखडले मानधन४स्वयंपाकी, मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले आहे. यामध्ये हिंगोली व वसमत तालुक्यातील मदतनिसांचे ४ महिन्यांपासून, सेनगाव ५ महिन्यांपासून तर कळमुनरी व औंढा तालुक्यात २ महिन्यांपासून मानधन मिळाले नाही.महाराष्टÑ राज्य शिक्षक संघाने दिले निवेदन४जिल्हा परिषद व खाजगी अनुदानीत शाळेतील शालेय पोषण आहार शिजविणाºया मदतनिसांचे आॅगस्ट -२०१७ पासून मानधन मिळाले नाही. शिवाय मुख्याध्यापकांना संबंधित शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड लिहिण्याकरिता मिळणारे १ हजार रुपये मानधनसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे याची दखल घेत मानधन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्टÑ राज्य शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले. निवेदनावर सुभाष जिरवणकर तसेच शिक्षक संघातील सर्व पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी