शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पानकनेरगावचे पानमळे लुप्त होण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 19:06 IST

पाणी कमी पडल्याने ही पानमळे मोडून टाकण्याची वेळ

ठळक मुद्देदुष्काळामुळे तीनच मळे शिल्लकपूर्वी ४० ते ५० शेतकऱ्यांकडे होते पानांचे मळे

- राहुल टकले 

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव या गावाची ओळख पानांच्या मळ्यांमुळे पानकनेरगाव अशी पडली. गत चार ते पाच वर्षांपूर्वी या गावात ४० ते ५० शेतकऱ्यांकडे नागवेलीच्या पानांचे मळे असायचे. मात्र सततच्या दुष्काळामुळे हे पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर असून सध्या फक्त ३ शेतकऱ्यांकडेच पानांचे मळे आहेत.

यंदा दुष्काळी स्थिती असूनही १० ते १५ शेतकऱ्यांनी पानमळ्यांची लागवड केली होती. मात्र पाणी कमी पडल्याने ही पानमळे मोडून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. येथील शेतकरी अनेक वर्षांपासून  पानमळ्यांची लागवड करत आला आहे. येथील पाने मराठवाडा विदर्भासह गुजरात, तेलंगणा इ. राज्यांत विक्री केली जात असे. १ हजार पानांना किमान ५० ते दोनशे  रुपयांचा दर त्या काळी मिळत असे. सध्या प्रतिहजार पानांना चारशे ते पाचशे रुपयांचा दर आहे. पाने खरेदी करण्यासाठी मराठवाडा-विदर्भातून व्यापारी येत. थेट पानांच्या मळ्यातून पाने खरेदी केली जात असे. इतर पिकांपेक्षा पानमळ्यांतून उत्पन्न चांगले मिळत असल्याने पानभरी क्षेत्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे पानांचे मळे होते. मात्र सततच्या दुष्काळाने येथील पानउत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून पानमळे संपुष्टात आले आहेत.  सध्या गावातील तीन शेतकरी टँकरचे विकत पाणी आणून हे पानमळे जोपासत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टँकर मिळणेही कठीण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पानमळे मोडून टाकले; तरीही महसूल प्रशासनाने साधा पंचनामाही केला नसल्याचे शेतकरी लक्ष्मण बोलवार यांनी सांगितले. 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका कायम उपेक्षित आहे. दुष्काळाने  मोठ्या प्रमाणात पानमळे मोडले. शेकडो एकरातील केळी करपल्या; मात्र महसूल प्रशासनाने अद्याप एकाही शेतकऱ्याच्या शेताचा पंचनामा केला नाही. शासनाच्या कोणत्याही उपाययोजना तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचे यावरुन दिसते. शासनाच्या दुर्लक्षामुळे हे मळेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पानकनेरगाव या एकमेव गावात पानमळे आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदत करुन पानउत्पादनात जिल्ह्याचे नाव झळकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अशी होते लागवड जून महिन्यामध्ये बेड तयार करून त्यावर एक ते दीड फूट अंतरावर शेवरीच्या झाडांची लागवड केली जाते. आॅगस्ट महिन्यात नागवेलीच्या पानांच्या काड्यांची त्यात लागवड केली जाते. पानांचे उत्पादन एप्रिल-मे महिन्यात निघण्यास सुरुवात होते. दरवर्षी मे महिन्यात पानांच्या वेली शेवरीच्या शेंड्यापर्यंत जातात. मात्र यंदा पाणी कमी पडल्यामुळे अडीच ते तीन फुटांपर्यंत वेलांची वाढ झाली आहे. अनेक वेली पाण्याअभावी विरुन गेल्या आहेत. त्यामुळे यंदा पानांचे उत्पन्न हाती हाती येईल, की नाही याचीच चिंता असल्याचे पान उत्पादक शेतकरी बोलवार यांनी सांगितले.

वृद्धांनाच जमते पानमळ्यात कामपानकनेरगाव येथे पूर्वीपासून पानमळे घेतले जातात. पानमळ्यांमुळेच पानकनेरगाव असे नाव गावाला मिळाले आहे. पानमळ्यातील कामे मेहनतीची नसून त्याचा अनुभव असलेल्या वृद्धांनाच मळ्यात काम जमते. त्यामुळे गावातील वृद्धांना रोजगार मिळत असे. तरुणांना हे काम शिकण्यासाठी अनेक दिवस लागतात.  पानकनेरगावातील पानमळे नैसर्गिक आपत्तीने नामशेष हात चालले आहेत. पानमळे जोपासणारी पिढी गेल्यानंतर पानमळे जोपासण्याची कलाही कालबाह्य होण्याची शक्यता पानउत्पादक शेतकऱ्यांतून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ