शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणाच्या १३ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरु; पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:54 IST

सध्या पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

इलीयास शेख, कळमनुरी ( जि. हिंगोली): तालुक्याजवळील इसापूर धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये ७ दरवाजे दीड मीटरने आणि ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. धरणातून सध्या ५४,४६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कळमनुरी ते शेंबाळ पिंपरी या विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक १६ ऑगस्टपासून बंद आहे.मागील तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. सध्या धरणात ९५.४६ टक्के जलसाठा आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता १६ ते ३१ ऑगस्ट या काळात धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

गावागावांततून पाण्याची आवक सुरू आहे...

पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, कन्हेरगाव, अनसिंग, सिरसम, खंडाळा आणि इसापूर या पाणलोट क्षेत्रांतून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. दरम्यान, इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या आणि पुराचा धोका असलेल्या गावांतील नागरिकांना सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पशुधनाला नदी काठावर येऊ नये...

पैनगंगा नदी पात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनाला पैनगंगा काठावर घेऊन जाऊ नये. पशुधनाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणmonsoonमोसमी पाऊस