पैनगंगेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:15+5:302021-08-28T04:33:15+5:30

सद्य:स्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणीपातळीत वाढ होत आहे. ...

Warning to the villages along Pangange | पैनगंगेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैनगंगेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सद्य:स्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणीपातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत ४४०.८२ मीटर ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणातून वक्रदाराद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. १, नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Web Title: Warning to the villages along Pangange