शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

10 हजार शेतकऱ्यांना वीज जोडण्यांची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:51 AM

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरींची कामे केवळ मंजूर केली जात आहेत. ती पूर्ण होत नसल्याने खा.राजीव सातव यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. तर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही उपमुकाअ नितीन दाताळ यांना निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याचा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरींची कामे केवळ मंजूर केली जात आहेत. ती पूर्ण होत नसल्याने खा.राजीव सातव यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. तर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही उपमुकाअ नितीन दाताळ यांना निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याचा इशारा दिला.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या खा.राजीव सातव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, आ.तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अ.जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, अ.मुकाअ ए.एम. देशमुख आदींची उपस्थिती होती.यावेळी मग्रारोहयोच्या सिंचन विहिरींचाच प्रश्न सुरुवातीला गाजला. सातव यांनी किती विहिरी पूर्ण झाल्या, असे विचारून वर्मावर बोट ठेवले. यात ३७२0 विहिरींना मंजुरी दिली असून १७२0 सुरू आहेत. तर १३५ पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. तालुकानिहाय चित्र तर गंभीरच होते. यात सुरू असलेल्या कामांपैकी ७0 टक्के काम पूर्ण झालेल्या कामांची संख्या नगण्या आढळली. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी सर्वच गटविकास अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तर या कामांना भेटी देवून नवीन कामे सुरू करण्यापेक्षा आहे तीच पूर्ण करा. अन्यथा जूनअखेर घर पाठवू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. तर खा.सातव यांनीही कळमनुरी तालुक्याचा वॉटर कप योजनेत समावेश असल्याने तेथे शोषखड्डे व इतर कामे गतीने करण्यास बजावले. तर काही गावांना अधिकाºयांसमवेत गावभेटी देवू, असेही ते म्हणाले. जर खरेच ग्रामसेवक, कृषी सहायक, बीडीओ कामे करणार नसतील तर त्यांना निलंबित करा. त्याशिवाय या योजनेला गती येणार नसल्याचे ते म्हणाले. तर १२ एप्रिलला स्वतंत्र बैठक घेण्यास सांगितले. जि.प.अध्यक्षा नरवाडे यांनीही ग्रामसेवक कुणाचेच ऐकत नसल्याचे गाºहाणे मांडले. शोषखड्ड्यांच्या १0१२ कामांना मंजुरी दिली असताना केवळ १३५ सुरू आहेत यावर जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली.पालकमंत्री पाणंद योजनेत प्रस्तावच आले नसल्याचे सर्व गटविकास अधिकाºयांनी सांगितले. तर जुने काही प्रस्ताव पं.स.कडे असल्याचे सांगण्यात आले. त्यावर प्रत्येक पंचायत समितीने प्रस्ताव मागवून घ्यावेत, असे आ.मुटकुळे यांनी सांगितले.बैठकीला अनेक अधिकाºयांची दांडी होती. अशांना नोटिसा बजावण्याचा आदेशही दिला. तर इंदिरा गांधी पुतळा सुशोभिकरणाचा डॉ.सतीश पाचपुते यांनी प्रश्न मांडला. हे काम न.प.कडून करण्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.पूर्णा-अकोला मार्गाच्या विद्युतीकरणाला मंजुरी मिळाल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले. त्यासाठी या मार्गावर दोन फिडर मंजूर झाले आहेत. यापैकी एक हिंगोली जिल्ह्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव सादर केल्यास त्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.तर या मार्गावरील लहान पुलांची काही कामे केली. काही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आ.मुटकुळे यांनी गोंडाळानजीक पूल नसल्याने रेल्वे पटरी ओलांडण्यास ५ किमीचा प्रवास करावा लागतो. येथे पूल उभारण्याची मागणी केली.हिंगोली जिल्ह्यातील महावितरणची सर्व कामे निधीअभावी अडली असल्यास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आ.मुटकुळे व मी बैठकीसाठी प्रयत्न करतो, असे खा.सातव यांनी सांगितले.भूमिगत वीजवाहिनी होईनाहिंगोली शहरात आयपीडीएस योजनेत मंजूर असलेली कामे गतीने होत नसल्याने खा.राजीव सातव यांनी फटकारले. बदली होणार असल्यासारखी उत्तरे देऊ नका, असे ते म्हणाले. तर यातील कंत्राटदारांना मी हजर करण्यास सांगितले तरीही का बोलावले नाही. त्यांच्यावर कारवाई करा, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला. मात्र गोलमाल उत्तर देत वेळ मारून नेण्यात आली.जिल्ह्यातील शेतकºयांना वीज जोडण्या मिळण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा खा.सातव यांनी मांडला. तर सद्यस्थिती विचारली. त्यावर महावितरण आपल्या दारी या योजनेत २५६0, सर्वसाधारण कोटेशन भरलेले ५३00, विशेष घटक योजनेतील १८0३ लाभार्थ्यांना वीज जोडणी देणे बाकी आहे. यासाठी निधीच नसल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले. तर यासाठी पारंपरिक पद्धतीनुसार १00 कोटी लागतील, असेही सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीagricultureशेती