पाच महिन्यांपासून वेतन थकल्याने काम बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST2021-05-08T04:30:54+5:302021-05-08T04:30:54+5:30
मग्रारोहयोअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता सीएससी अथवा एसव्हीपी या बाह्यस्थ संस्थेमार्फत नियुक्ती देऊन त्यांच्यामार्फत वेतन देण्याचा आदेश देण्यात आला ...

पाच महिन्यांपासून वेतन थकल्याने काम बंदचा इशारा
मग्रारोहयोअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता सीएससी अथवा एसव्हीपी या बाह्यस्थ संस्थेमार्फत नियुक्ती देऊन त्यांच्यामार्फत वेतन देण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा याला विरोध आहे. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून हे कर्मचारी कामावर असले तरीही त्यांना कोणतेच मानधन अथवा वेतन मिळत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच सेतूकडून आदेश न दिल्यास ११ मेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एकट्या हिंगोली जिल्ह्यात असे २४ कर्मचारी आहेत. राज्यात सातशे ते आठशे कर्मचारी असून त्या सर्वांचा हा प्रश्न आहे. राज्यासोबतच हिंगोलीतील कर्मचारी आंदोलन करणार आहेत. राज्य कृती समितीनेही या मागण्या केल्या असून त्यात ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे, संक्रमित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा लागू करणे, व्ही. गिरीराज समितीच्या अहवालानुसार स्वतंत्र विभाग तयार करून सेवेत कायम करणे आदी मागण्याही केल्या आहेत.
या निवेदनावर अखिलेश कुरील, प्रकाश फड, दीपक गायकवाड, विनोद घेडके, विजय कदम, गौतम मोरे, अभिमन्यू ढोणे, विजय नरवाडे, शे. फय्याज, एन.डी. राठौर, देवराव कंठाळे आदी २३ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.