वाडी, तांड्यावर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:31 AM2021-03-16T04:31:05+5:302021-03-16T04:31:05+5:30

बस स्थानकात धूळ वाढली हिंगोली: येथील बस स्थानकात मागील काही दिवसांपासून धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध आजारांना ...

Wadi, water scarcity at Tandya | वाडी, तांड्यावर पाणीटंचाई

वाडी, तांड्यावर पाणीटंचाई

Next

बस स्थानकात धूळ वाढली

हिंगोली: येथील बस स्थानकात मागील काही दिवसांपासून धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. धुळीबरोबरच प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांना सोईसुुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

गतिरोधक बनले धोकादायक

हिंगोली: कयाधू नदीजवळील गतिरोधक मागील काही दिवसांपासून धोकादायक बनले आहे. दुचाकी वाहनचालक गतिरोधकावरून न जाता बाजूने जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. कित्येक वेळा येथे वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

हिंगोलीत वानरउड्या सुरूच

हिंगोली: शहरातील शास्त्रीनगर, शिवाजीनगर, कापड गल्ली, पेन्शनपुरा आदी भागांमध्ये अन्न व पाण्याच्या शोधात वानरांची टोळी दाखल झाली आहे. घरावरील छतावरून उड्या मारत वानरे अंगणात ठेवलेल्या पदार्थाची नासाडी करीत आहेत. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Wadi, water scarcity at Tandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.