कुरुंदा ग्रा.पं.चे १६ जागा बिनविरोध, एक जागेसाठी होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:51+5:302021-01-08T05:37:51+5:30
कुरुंदा : वसमत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अंत्यत महत्वाची ग्रामपंचायत म्हणून कुरुंदाकडे पाहिले जात होते. आतापर्यंत गावातील सर्वच निवडणुका अटीतटीच्या पार ...

कुरुंदा ग्रा.पं.चे १६ जागा बिनविरोध, एक जागेसाठी होणार मतदान
कुरुंदा : वसमत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अंत्यत महत्वाची ग्रामपंचायत म्हणून कुरुंदाकडे पाहिले जात होते. आतापर्यंत गावातील सर्वच निवडणुका अटीतटीच्या पार पडल्या. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष कुरुंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे असायचे. गावाच्या इतिहासात प्रथम ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. फक्त एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. या बिनविरोध प्रक्रियेत वसमत बाजार समिती सभापती राजेश पाटील इंगोले यांना स्पष्टपणे बहुमत मिळाल्याने त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचे सूत्र जाणार आहे.
कुरुंदा येथील ग्रामपंचायत १७ सदस्यांची असून ९४०० मतदान आहे. जवळपास २० हजार लोकसंख्येचे हे गाव असून या ग्रामपंचायतवर सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षाकडून मोर्चेबांधणी केल्या जाते. अत्यंत चुरशीची लढत या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहण्यात मिळते. आता लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १६ जागा बिनविरोध निघाल्या आहेत. बिनविरोध प्रक्रियेत स्पष्टपणे बहुमत वसमत बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले यांना प्राप्त झाले आहे. प्रथमच बिनविरोधाची प्रक्रिया पार पडली. वार्ड क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. शेवटच्या दिवशी झालेल्या प्रक्रियेत सभापती राजेश पाटील यांना १४ जागा देण्यात आल्या. शिवसेना, रा.काॅ.यांना २ जागा देण्यात आल्या तर एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.
प्रतिकिया
गावकऱ्यांनी विकासाच्या दृष्टीकोनातून आमच्यावर विश्वास टाकला आहे. गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे वसमत बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले यांनी सांगितले.