२७ केंद्रांवर आज मतदान
By Admin | Updated: June 20, 2014 00:09 IST2014-06-20T00:09:48+5:302014-06-20T00:09:48+5:30
हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० जून रोजी जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत.

२७ केंद्रांवर आज मतदान
हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० जून रोजी जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपला. शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यानुसार हिंगोली शहरातील तहसील कार्यालयात ४ मतदान केंद्र आहेत. तसेच बासंबा, सिरसम बु., नर्सी, माळहिवरा, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, सेनगाव, आजेगाव, साखरा, औंढा तालुक्यातील येहळेगाव सो., औंढा, साळणा, जवळा बाजार, वसमत तालुक्यातील हट्टा, टेंभुर्णी, वसमत ग्रामीण, शहर, कुरूंदा, गिरगाव, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, डोंगरकडा, आखाडा बाळापूर व कळमनुरी या मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या कर्मचाऱ्यांना मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास हे कर्मचारी नियुक्त केंद्रांकडे रवाना झाले. मतदानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना दिवसभरात चार तासांची सुट्टी मिळणार आहे. मतदान केंद्र परिसरात पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान, जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात पदवीधरसाठी ११ हजार ४४८ मतदार
सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान होणार
मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर कर्मचारी नियुक्त.