व्हिडिओ शूट करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:05 IST2019-01-07T00:04:09+5:302019-01-07T00:05:00+5:30
कळमनुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दोघांनी कोणाचीही परवानगी न घेता थेट रूग्णालयाच्या प्रसूती व महिलागृहात प्रवेश केला. तसेच यावेळी मोबाईलमध्ये शूटींग काढत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली.

व्हिडिओ शूट करणे पडले महागात
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दोघांनी कोणाचीही परवानगी न घेता थेट रूग्णालयाच्या प्रसूती व महिलागृहात प्रवेश केला. तसेच यावेळी मोबाईलमध्ये शूटींग काढत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात राजू किशन कांबळे व अजीजखान कादरखान पठाण या दोघांनी प्रवेश केला. यावेळी रूग्णालयात डॉ. मेने, डॉ. बांगर, डॉ. सोफिया व इतर कर्मचारी कर्तव्य बजावत होते. दोघांनीही कोणाची परवानगी न घेता थेट रूग्णालयातील महिला प्रसूतीगृह तसेच महिलागृहात व इतर विभागाची शुटींग केली. याबाबत संबंधित डॉक्टर व कर्मचाºयांची दमदाटी केली. तसेच रूग्णालयातील साहित्य व औषधीची तोडफोड केली. या संदर्भाची फिर्याद कळमनुरी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत रामराव लोणीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी राजू कांबळे व अजीजखान कादरखॉन पठाण या दोघांविरूद्ध विविध कलमान्वये शासकीय कामात अडथळण आणल्याप्रकरणी तसेच शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कळमनुरी ठाण्याचे पोउपनि एस. एस. घेवारे हे करीत आहेत. रूग्णालयातील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय विनापरवानगी शुटींग काढून रूग्णालयातील साहित्य औषधीचे नुकसान केल्यामुळे दोघा आरोपींना चांगलेच महागात पडले.