Video: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर, दगड पडले काळे; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार
By विजय पाटील | Updated: July 5, 2023 15:20 IST2023-07-05T15:11:30+5:302023-07-05T15:20:29+5:30
काही दिवसांपासून येथील जागेतून धूर निघत आहे. तेथील दगड काळे पडले आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

Video: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर, दगड पडले काळे; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार
शिरड शहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा शिवारातील माळरानात जमिनीतून अचानक धूर निघत असून तेथील जमीनही गरम झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा शिवारातील माळरानात एका लोखंडी खांबाजवळ जमिनीतून अचानक धूर निघत आहे. तसेच तेथील जमीनही गरम झाली आहे. जमिनीतून धूर निघत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस पाटील प्रदीप पवार यांना दिली. त्यांनी तहसील कार्यालयात हे कळवले.
हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा शिवारात जमिनीतून अचानक धूर निघत असून तेथील जमीनही गरम झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. pic.twitter.com/Bv3v3RJgLZ
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 5, 2023
दरम्यान, तहसीलदारांनी तलाठी एम. एफ. फोपसे, मंडळ अधिकारी सुरेश बोबडे यांना घटनास्थळी रवाना केले. तसेच महावितरण वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता अश्विन कुमार मेश्राम यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली. काही दिवसांपासून येथील जागेतून धूर निघत आहे. तेथील दगड काळे पडले आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.