वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबियांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST2021-05-27T04:31:35+5:302021-05-27T04:31:35+5:30

वेणुगोपाल हे आज दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबियांची भेट घेतली. विशेष ...

Venugopal consoled the seventh family | वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबियांचे सांत्वन

वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबियांचे सांत्वन

वेणुगोपाल हे आज दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबियांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती. कळमनुरी येथे सातव कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चाही केली. अत्यंत गोपनीय चर्चा असल्याने त्या ठिकाणी सातव कुटुंबियांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यानंतर त्यांनी खासदार सातव यांना श्रध्दांजली अर्पण करून दिल्लीकडे रवाना झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वेणुगोपाल यांच्या गोपनीय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.

यावेळी वेणुगोपाल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संपतकुमार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, आ. अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आ. डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नगरसेवक अनिल नेनवाणी, डॉ. सतीश पाचपुते, एस. पी. राठोड, रमेश जाधव, प्राचार्य बबन पवार, विलास गोरे, नंदकिशोर तोष्णीवाल, केशव नाईक, बापूराव घोंगडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देऊन सातव कुटुंबातील एकास राज्यसभेवर घेण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Venugopal consoled the seventh family