जिल्हा रुग्णालयात ‘नो पार्किंग’ मध्येच लावली जातात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:47+5:302021-02-26T04:42:47+5:30

हिंगोली : गरिबांचा दवाखाना म्हणून जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. परंतु, मागील काही दिवसांपासून रुग्णालयातील वाहनतळाला अवकळा आली आहे. जागा ...

Vehicles are parked in the 'no parking' area of the district hospital | जिल्हा रुग्णालयात ‘नो पार्किंग’ मध्येच लावली जातात वाहने

जिल्हा रुग्णालयात ‘नो पार्किंग’ मध्येच लावली जातात वाहने

Next

हिंगोली : गरिबांचा दवाखाना म्हणून जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. परंतु, मागील काही दिवसांपासून रुग्णालयातील वाहनतळाला अवकळा आली आहे. जागा दिसेल तिथे कोठेही वाहने व रुग्णवाहिका उभी करत आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना तसेच नातेवाईकांना दवाखान्यात प्रवेश करतेवेळेस नाना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दवाखान्यातील वाहनतळाचे कॉन्ट्रॅक्ट एका खासगी कंपनीला देण्यात आले असून, कंपनीने वाहनतळाची देखभाल करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दोन गार्डची नेमणूक केली आहे. परंतु, हे गार्ड वाहने व्यवस्थित लावण्याऐवजी रुग्णांच्या नातेवाईकांशी गप्पा मारण्यात वेळ घालवतात. कधी कधी रुग्णवाहिकेतून आलेल्या रुग्णांना स्ट्रेचरवर ठेवण्यासाठी मदत करतात. मदत करणे हे काही गैर नाही. पण, वाहने अस्ताव्यस्त लावली जात असल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरे पाहिले तर जिल्हा सामान्य रुग्णालयात चार ते पाच स्ट्रेचर आहेत. अति गंभीर आजार असलेले रुग्ण रुग्णवाहिकेतून आणले जातात. तेव्हा जिल्हा रुग्णालयातील स्ट्रेचर कुठे असतात? हाही मोठा प्रश्न आहे. बहुतांशवेळा त्यांना बोलवावे लागते.

मेस्को कंपनीला दिली जाणार सूचना

जिल्हा रुग्णालयातील वाहनांची देखभाल करणे, वाहने व्यवस्थितरित्या लावणे, रुग्णांची तसेच नातेवाईकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे, हे मेस्को कंपनीने नेमलेल्या गार्डचे प्रथम काम आहे. दिलेले काम ते व्यवस्थित करत नसतील त्यांना प्रथम सूचना दिली जाईल. यानंतर मात्र पुढील कार्यवाही केली जाईल.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली

Web Title: Vehicles are parked in the 'no parking' area of the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.