लोकमत न्यूज नेटवर्क, गोरेगाव (जि. हिंगोली) : कुटुंबापासून दुरावलेल्या वासुदेवच्या प्रतीक्षा करीत असलेल्या आईचे डोळे अक्षरश: कोरडे झाले. पण, सहा वर्षानंतर एक दिवस असा उजाडला की आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रद्धा फाऊंडेशनच्या मदतीने घरी परतलेल्या वासुदेवची गळाभेट घेताना आईचे आनंदाश्रू अनावर झाले.
संस्थेत आश्रय दिला५ ऑक्टोबर २०२४ रोजी श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन (कर्जत) व विशाखापट्टणम येथील ‘एयुटीडी’ स्वयंसेवकांनी त्याला संस्थेत घेऊन आश्रय दिला.
मनोरुग्ण अवस्थेत असल्याने त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. वासुदेवच्या मानसिक अवस्थेत सुधारणा झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ फेब्रुवारीला गोरेगाव गाठले व वासुदेवला कुटुंबाच्या स्वाधीन केले. सहा वर्षांनंतर वासुदेव घरी आल्याचे पाहताच कुटुंबातील सर्व सदस्य आनंदित झाले होते. गोरेगाव येथील वासुदेव पोहनकर हा २०१९ मध्ये घरून निघून गेला. तेव्हापासून घरचे शोध घेत होते. तो सापडला नाही. वासुदेव विशाखापट्टणम येथे फिरताना आढळला.