शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वसमत तालुका पुन्हा भूकंपाने हादरला; तीन दिवसांतील दुसरी घटना, नागरिकांमध्ये भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:51 IST

दोनच दिवसांपूर्वी, म्हणजेच ३० डिसेंबर रोजी पहाटे सुद्धा तालुक्यात भूकंपाचा मोठा धक्का जाणवला होता.

वसमत: तालुक्यात भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० डिसेंबरच्या धक्क्यानंतर,१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी पुन्हा एकदा तालुक्याच्या विविध भागांत भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. सततच्या या धक्क्यांमुळे नागरिक जीव मुठीत धरून घराबाहेर धावत सुटले होते.

गुरुवार रोजी सायंकाळी झालेल्या भूकंपामुळे प्रामुख्याने पांगरा शिंदे, आंबा, कुरुंदा,डोनवाडा, खांबाळा, सुकळी, कोठारी यासह अनेक गावांना भुकंपाचा धक्का बसला यावेळी भांडी-वस्तू हालल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. अनेक ठिकाणी नागरिक घाबरून रस्त्यावर आणि मोकळ्या मैदानात जमा झाले होते.

दोन दिवसांतील दुसरी घटनादोनच दिवसांपूर्वी, म्हणजेच ३० डिसेंबर रोजी पहाटे सुद्धा तालुक्यात भूकंपाचा मोठा धक्का जाणवला होता. त्या धक्क्याची नोंदही झाली होती. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत पुन्हा धक्का बसल्याने जमिनीच्या पोटात नक्की काय हालचाली सुरू आहेत, याबाबत सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून जनजागृतीची मागणीसतत जाणवणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरांना तडे जाण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "आम्ही सतत दहशतीखाली जगत आहोत, प्रशासनाने आता केवळ नोंद घेऊन न थांबता, या संदर्भात गावोगावी जाऊन जनजागृती करावी आणि आम्हाला सुरक्षिततेचे उपाय सांगावेत," अशी मागणी पांगरा शिंदे परिसरातील नागरिकांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasmat Taluka Shaken by Earthquake Again; Fear Grips Residents

Web Summary : Vasmat Taluka experienced another earthquake, the second in three days, causing widespread panic. Residents are demanding safety awareness programs from the administration due to fears of structural damage and potential disasters after the repeat tremors.
टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली