सेनगावात वऱ्हाडाच्या ऑटोला टिपरने उडवले; ९ वऱ्हाडी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 18:28 IST2020-03-13T18:26:16+5:302020-03-13T18:28:04+5:30
ही सर्व वऱ्हाडी मंडळी वरुड चक्रपान येथे मुक्कामी राहून पहाटे आपल्या गावी परतत होते.

सेनगावात वऱ्हाडाच्या ऑटोला टिपरने उडवले; ९ वऱ्हाडी गंभीर जखमी
सेनगाव : लग्न लावून आपल्या गावी परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या ऑटोला भरधाव टिपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ऑटोतील नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील साई मंदिराजवळ घडली. जखमींवर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने, त्याना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.
या अपघातात अरुण अशोक तरोटे (40) रा. दमय वाडी ता परभणी, वैष्णवी देविदास कदम (5) इडोळी मंठा, अशोक नामदेव तरोटे (50) रंगनाथ अनंतराव पंडित वरुड चक्र ता. सेनगाव, गंगाराम भोजीराम ननेर (70) (सारंगापूर जि परभणी), लक्ष्मीबाई गंगाराम ननेर (65), उर्मिला बाई अश्रूबा रसाळ ( पिंपळगाव ठोबरे), साळबा घनश्याम फासाटे (50) दारेफळ ता. वसमत, पुष्पबाई सुभाश तरोटे(40) वाडी दमयी हे जखमी झाले.
ही सर्व वऱ्हाडी मंडळी वरुड चक्रपान येथे मुक्कामी राहून पहाटे आपल्या गावी परतत होते. दरम्यान, सेनगाव ते वरुड चक्रपाण रस्त्यावरील फाट्यावर टिपरने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये ऑटो उलटला आणि त्यातील ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती 108 रुग्णवाहिकेला देतात घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांनी जखमींना जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. या प्रकरणी अजून कोणतीही नोंद झालेली नाही.