विनापरवाना सागवान तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:35 IST2018-06-13T00:35:19+5:302018-06-13T00:35:19+5:30
तालुक्यातील तामटी तांडा येथील शेतकरी महिलेने परवानगी न घेता सागाच्या लाकडाची कत्तल केल्या प्रकरणी वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे

विनापरवाना सागवान तोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील तामटी तांडा येथील शेतकरी महिलेने परवानगी न घेता सागाच्या लाकडाची कत्तल केल्या प्रकरणी वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे
औंढा नागनाथ तालुक्यातील तामटी तांडा येथील शेतकरी महिला अरूणा कोळेकर यांनी परवानगी न घेता शेतातील सागाची झाडे तोडून जमा केली आहेत. झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत वनाधिकारी एम. केंद्रे यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर शेतकऱ्याने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. यात वन अधिनियमानुसार कारवाई सुरू आहे. या झाडांची मोजणी केल्यानंतरच किंमत व इतर बाबींचा तपशिल सांगता येणार नाही. ही कारवाई लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.