अल्पवयीन मुलाचे सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; औंढा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 16:45 IST2018-12-28T16:45:13+5:302018-12-28T16:45:57+5:30
तालुक्यातील सळणा येथे दोन अल्पवयीन मुले एका घरात खेळत होते.

अल्पवयीन मुलाचे सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; औंढा तालुक्यातील घटना
औंढा नागनाथ (हिंगोली ) : एका अल्पवयीन मुलाने सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. तालुक्यातील सळणा घडलेल्या या घटनेची गुरुवारी रात्री औंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी तालुक्यातील सळणा येथे दोन अल्पवयीन मुले एका घरात खेळत होते. यावेळी दोघातील १५ वर्षीय मुलाने दुसऱ्या ७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार केले. मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना हा प्रकार समजला. त्याच्यावर हिंगोली येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.