शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोघी बहिणी, दोघी कमाल! नऊवारी साडीत अनवाणी धाव, भाजीविक्रेत्या आजींनी मॅरेथॉन गाजवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:56 IST

वसमतच्या दोन भाजी विक्रेत्या बहिणींची मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक धाव; अनवाणी पायांनी जिंकली मने

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली): 'वय हे केवळ एक आकडा आहे आणि जिद्द असेल तर परिस्थितीवरही मात करता येते,' हे वसमतमधील दोन सख्या बहिणींनी रविवारी (११ जानेवारी) प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले. घरचा गाडा ओढण्यासाठी रोज भाजीपाला विक्री करणाऱ्या पार्वतीबाई बुरकुले (६०) आणि पुण्यारत्नाबाई मोदे (६५) या दोन बहिणींनी शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या दोघींनीही बक्षीस पटकावून शहराचा गौरव वाढवला आहे.

एक अनवाणी धावली, तर दुसरी फाटक्‍या बुटांत! राजू नवघरे सेवा प्रतिष्ठान आणि बाभुळगाव सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून नामांकित धावपटू आले होते. मात्र, या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या त्या तथागतनगरमधील या दोन भगिनी. ६० वर्षीय पार्वतीबाई चक्क अनवाणी पायाने ३ किमी धावत होत्या, तर ६५ वर्षीय पुण्यारत्नाबाई यांनी चक्क फाटके बूट घालून ही शर्यत पूर्ण केली. अंगावर साधी नऊवारी साडी आणि पायात कोणतीही विशेष सोय नसताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आत्मविश्वासाने पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले.

बक्षिसाची कमाई आणि मान्यवरांकडून कौतुक या चुरशीच्या शर्यतीत पार्वतीबाईंनी पाचवा, तर पुण्यारत्नाबाईंनी नववा क्रमांक पटकावून सर्वांना थक्क केले. त्यांच्या या साहसाचे कौतुक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि आमदार राजू नवघरे यांनी स्वतः सत्कार करून केले. कष्टाची भाकरी खाणाऱ्या या दोन माऊलींच्या जिद्दीला आज संपूर्ण महाराष्ट्र सलाम करत आहे. "इच्छा तिथे मार्ग" या म्हणीची जिवंत प्रचिती या दोन्ही भगिनींनी आज समाजाला दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Two sisters, two wonders! Grandmothers conquer marathon in simple attire.

Web Summary : Vasmat sisters Parvatibai and Punyaratnabai, aged 60 and 65, excelled in a marathon, proving age is just a number. Despite selling vegetables daily and facing hardships, Parvatibai ran barefoot and Punyaratnabai in torn shoes, winning prizes and earning accolades for their determination.
टॅग्स :MarathonमॅरेथॉनHingoliहिंगोली