शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सेनगाव तालुक्यात दोघा भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 4:54 PM

उटी ब्रम्हचारी येथे रविवारी सांयकाळी गावातील विहिरीमध्ये (पुरातन बारव) दोन लहान भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील उटी ब्रम्हचारी येथे रविवारी सांयकाळी गावातील विहिरीमध्ये (पुरातन बारव) दोन लहान भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

उटी ब्रम्हचारी येथील रोजमजूरी करून उदरनिर्वाह करणारे राजकुमार खरादे यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्य आहेत. त्यांची दोन्ही मुले हर्षल राजकुमार खरादे (५), समर्थ राजकुमार खरादे (३) ही दोघे भावंडे रविवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गावातील महादेव मंदिराच्या परिसरात नेहमी प्रमाणे खेळण्यासाठी गेले होते. पंरतु दोघे भावंडे रात्री ८ वाजेपर्यंत घरी परत आले नाहीच, त्यामुळे ग्रामस्थांनी गावात शोध घेतला. दरम्यान मध्यरात्री गावातील मंदिराजवळील बारवामध्ये हर्षलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर आज सकाळी ग्रामस्थांनी समर्थचा मृतदेह बारवाच्या पाण्यातुन बाहेर काढला.

दोन्ही भावंडांचा खेळण्याचा नांदात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गावा जवळ असलेल्या पुरातन बारवात  मोठ्या  प्रमाणात पाणी असून दोन्ही निरागस भावंडे एकाच वेळी बुडून मृत्यू पावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. खरादे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आल्याचे फौजदार मोरे यांनी सांगीतले.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीStudentविद्यार्थी