शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

आणखी दोन गुन्ह्यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:16 AM

तालुक्यातील साखरा येथील दुकान बंद करुन येलदरीकडे जाणाऱ्या सराफाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांनी पोलीस कोठडीत आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील साखरा येथील दुकान बंद करुन येलदरीकडे जाणाऱ्या सराफाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांनी पोलीस कोठडीत आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.सेनगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून चाकूचा धाक दाखवून लुटणाºया टोळीने उच्छाद मांडला होता. रस्त्यावरुन प्रवास करणाºया अनेक व्यापाऱ्यांना या टोळीने लुटले होते. तालुक्यातील विविध भागात दोन महिन्यांत ६ घटना घडल्या होत्या. सदर आरोपींचा मागावर पोलीस यंत्रणा असताना मगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास साखरा येथील दुकान बंद करून दुचाकीवरून येलदरीकडे जाणाºया सराफीस या टोळीने लुटले. दोन दुचाकीवर असलेल्या तीन चोरट्यांनी साखरा येथून पाठलाग करीत लिंबाळा पाटीनजीक गजानन डहाळे यांना आडवून गळ्याला चाकू लावला. त्यांच्याकडील १ लाख २३ हजार रुपयांचे सोने- चांदीची दागिने ठेवलेली बॅग हिसकावून सेनगावच्या दिशेने पलायन केले. डहाळे यांनी हे पोलिसांना कळविले. त्यानंतर सेनगाव-वरुडचक्रपान रस्त्यावर नदीनजीक दोन चोरट्यांना पोलीस व काही तरुणांनी पकडले होते. बॅगही मिळाली. गोपाल देवराव पायघन (२६, रा. अंजनखेडा, जि.वाशिम), दिनकर पांडुरंग रणबावळे (३६), गोपाल श्रीराम लांडगे (२६) (दोघेही रा. माझोड, ता.सेनगाव) या तिघांना पकडले होते. सेनगाव येथील न्यायालयाने बुधवारी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी लिंगदरी पाटीवजळ व अकोला जिल्ह्यात एकाला लुटल्याची कबुली दिली होती. तर प्रमुख सूत्रधार गोपाल पायघनचा अनेक गुन्ह्यामध्ये समावेश असून तो अन्य साथीदाराबरोबर इतर गुन्ह्यात समावेश असू शकतो, असा अंदाज पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव यांनी व्यक्त केला. चोरट्यांकडून विनाक्रमांकाच्या दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून त्याचा तपासही लावला जाणार आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी