इमारतीचे रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 19:25 IST2019-12-18T19:24:22+5:302019-12-18T19:25:58+5:30
शिडीत वीज प्रवाह उतरल्याने दोघांचा शॉक लागून मृत्यू

इमारतीचे रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
कुरूंदा : वसमत तालुक्यातील करूंदा येथे एका दुकानाच्या बांधकामावर पेंटींगचे काम करताना अचानक मोठ्या विद्युत लाईनचा शिडीत वीज प्रवाह उतरल्याने दोघांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
कुरुंदा येथे बस स्थानक परिसरात एका दुकानाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. याच ठिकाणी पेटींगचे काम करणारे शेख आयुब नदाफ तसेच दुकानातील कामगार बालाजी वटमे या दोघांना विजेचा शॉक लागला. शॉक लागल्याने दोघेही जमिनीवर कोसळले. जबर शॉकमुळे दोन्ही मयत काळसर पडले होते. ग्रामस्थांनी या दोघांनाही उपचारासाठी नांदेड येथे शासकीय दवाखान्यात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या घटनमुळे गावावर शोककळा पसरली आहे.