शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या दुष्काळझळांची तीव्रता जाणवत आहे. मात्र निवडणुकांतील राजकीय गोंगाटात जनतेला आपला आवाज कोणी ऐकणार नाही, याची जाणीव झाल्याने निमूटपणे हे सगळे सहन करण्याची वेळ आली आहे. टंचाईत पाण्याचा प्रश्न तर सगळीकडे बिकट आहे. मात्र निवडणुकीच्या कामाचे व आचारसंहितेचे कारण दाखवून कोरड पडलेल्या घशाने आवाज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाय पुढारीही टंचाई आचारसंहितेच्या बाहेरची बाब असली तरीही यावर चकार शब्दही बोलत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून गावोगावचे लोक पारावरच्या राजकीय गप्पांमध्येच टंचाईवर बोलत आहेत. इसापूर धरणात जिवंतसाठा २५२ दलघमी असून हे प्रमाण २६.२१ टक्के आहे. तर सध्या या धरणाची पाणीपाळी सुरू असल्याने विसर्गही होत आहे.येलदरी धरणात १0२ दलघमी मृतसाठा तर सिद्धेश्वर धरणात १६७.२५५ दलघमी मृतसाठा आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव हे जोत्याखाली गेले. तर सवड तलावात ३ टक्के जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव जोत्याखाली तर घोडदरी तलावात १ टक्के जलसाठा आहे. औंढा तालुक्यातील वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, काकडदाभा व केळी हे तलाव जोत्याखाली गेले. तर सुरेगाव ८ टक्के, औंढा ४१ टक्के, पुरजळ-२ टक्के, पिंपळदरी १९ टक्के पाणीसाठा आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी ८ टक्के, बोथी १0 टक्के, दांडेगाव ३ टक्के तर देवधरी जोत्याखाली आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावात १८ टक्के जलसाठा आहे. पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावही जोत्याखाली गेला आहे.याशिवाय पाच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांत एकूण १८ टक्के जलसाठा आहे. यात सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा ५ टक्के, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १४ टक्के, परभणी तालुक्यातील राहाटी ६३ टक्के तर हिंगोली तालुक्यातील खेर्डा तलाव कोरडा पडला आहे.जिल्हा यंदा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. शासनाकडून जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता हैराण आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्याने नदी, नाले, ओढेही दुधडी भरून वाहिले नाहित. त्यामुळे यंदा पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय-योजनांची मागणी होत आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण