जवळा बाजार येथे नाकाबंदी दरम्यान दोन खंजीरासह तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 13:34 IST2021-01-01T13:29:47+5:302021-01-01T13:34:53+5:30

crime Hingoli : ३१ डिसेंबर राेजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण रस्त्याने ये - जा करत हाेते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

Two daggers were seized during a blockade at a nearby market | जवळा बाजार येथे नाकाबंदी दरम्यान दोन खंजीरासह तिघे ताब्यात

जवळा बाजार येथे नाकाबंदी दरम्यान दोन खंजीरासह तिघे ताब्यात

ठळक मुद्दे एका जीपसह दोन लोखंडी खंजीर जप्त

जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे ३१ डिसेंबर रात्री एका जीपमधून हत्यारासह जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले. हट्टा पोलिसांनी ही कारवाई केली असून एका जीपसह दोन लोखंडी खंजीर जप्त केले आहेत.

३१ डिसेंबर राेजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण रस्त्याने ये - जा करत हाेते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यादरम्यान १ जानेवारी रोजी रात्री १ वाजता सुमारास हट्टाकडून जवळा बाजारकडे येत असलेली जिपमधून ( एमएच ३८- ७६५५ ) तिघे जण प्रवास करीत होते. या तपासणीत त्यांच्याजवळ दोन लोखंडी खंजीर आढळून आले. यानंतर पोलिसांनी तिघांवर कारवाई केली. ही कारवाई हट्टाचे सपोनि गजानन मोरे, पोलीस नायक राजेश ठाकूर, अरविंद गजभार, खतीब, कावरखे, नागनाथ, नजान, राजाराम कदम, राजेश वळसे यांनी केली.

याबाबतची फिर्याद पोलीस नाईक राजेश ठाकूर यांनी दिली. आरोपी अनिल वसंत राठोड रा. दरेगाव ह. मु. शास्त्रीनगर जवळा बाजार, अविनाश शिवाजी चोपडे रा. भाग्यनगर वसमत, आकाश शंकर ठोंबरे रा. रांजोना ता. वसमत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two daggers were seized during a blockade at a nearby market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.