एसटी पार्सलमधील अडीच क्विंटल डिंक पकडला

By Admin | Updated: September 25, 2014 01:16 IST2014-09-25T01:02:31+5:302014-09-25T01:16:07+5:30

हिंगोलीवरुन जळगाव खांदेशकडे जाणारा डिंक डोणगाव येथील वन उपवन तपासणी नाक्यावर पकडला.

Two-and-a-half quintal gum caught in ST parcel | एसटी पार्सलमधील अडीच क्विंटल डिंक पकडला

एसटी पार्सलमधील अडीच क्विंटल डिंक पकडला

डोणगाव (बुलडाणा) : नांदेड, कळमनुरी, जळगाव खांदेश बस क्र. एम.एच.२0 सी.९८८८ ने हिंगोलीवरुन जळगाव खांदेशकडे अंकल कुरीअर पार्सलने जाणारा जंगली डिंक डोणगाव येथील वन उपवन तपासणी नाक्यावर वनरक्षक आर.बी.वाघ यांच्या सतर्कतेने पकडल्या गेला.
थोडक्यात हकीकत अशी की, नांदेड वरुन जळगाव खांदेश कडे जाणार्‍या बसमध्ये जंगली डिंक असल्याची गुप्त माहिती वनरक्षक आर.बी.वाघ यांना समजताच त्यांनी नाकाबंदी करुन डोणगाव उपवन तपासणी नाक्यावर सदर बस थांबविली व झडती घेतली असता, सदर एसटी बसच्या टपावर अडीच क्विंटल जंगली डिंक असल्याचे आढळून आले. सदर डिंक त्यांनी जप्त केला. सदर डिंक हा हिंगोलीवरुन एस.डी.वर्मा नावाच्या व्यक्तीने पाठविला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सदर डिंक जळगाव खांदेशला कुणाकडे जात आहे, याची चौकशी वनरक्षक आर.बी.वाघ हे करीत आहेत.

Web Title: Two-and-a-half quintal gum caught in ST parcel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.