शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

'रास्त भाव, तत्काळ पैसा'; मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील हळद हिंगोलीच्या मार्केट यार्डात

By रमेश वाबळे | Published: April 16, 2024 7:17 PM

समाधानकारक भाव, विश्वासार्हता आणि हळद विक्री केल्यानंतर पैसे तत्काळ मिळत असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत.

हिंगोली : हळद खरेदी-विक्रीसाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशातून हळदीची आवक होत आहे. त्यामुळे मार्केट यार्ड आवारासह बाहेरही वाहनांच्या रांगा लागत असून, जवळपास २० हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याची माहिती बाजार समितीने दिली.

सध्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांकडे नवीन हळद उपलब्ध झाली आहे. तर काही शेतकऱ्यांची हळद काढणीची लगबग सुरू आहे. बाजारात सध्या भाव समाधानकारक असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे हळद उपलब्ध झाली, ते आता आणखी भाववाढीची अपेक्षा न करता विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यापासून आवक वाढली असून, मार्केट यार्ड आवारासह बाहेर वाहनांच्या एक ते दीड किमीपर्यंत रांगा लागत आहेत.

मार्केट यार्डात शनिवारी व रविवारी हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे दर सोमवारी हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली असली तरी सध्या मिळणारा भाव समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी भाववाढीची आशा न करता शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत.

समाधानकारक भाव, विश्वासार्हता आणि हळद विक्री केल्यानंतर पैसे तत्काळ मिळत असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. १६ एप्रिल रोजी हिंगोलीसह नांदेड, परभणी, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अकोला, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणल्याचे बाजार समितीने सांगितले.

अवकाळीने वाढविली चिंता...जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांकडून हळद काढणीचे काम सुरू आहे. त्या हळदीवर तर अवकाळी पावसाचे पाणी फेरल्या जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अगोदर हळद काढून विक्रीसाठी आणली, त्यांची हळद वाहनात भिजण्याची शक्यता निर्माण होत आहे. शेतकरी ताडपत्री झाकून हळद विक्रीस आणत आहेत. परंतु जोरात पाऊस झाल्यास हळदीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मार्केट यार्डात २९५, तर गेटच्या बाहेर १३५ वाहनांची रांग....मागील दोन दिवसांत मार्केट यार्डात हळदीची आवक विक्रमी होत आहे. मंगळवारी दुपारपर्यंतच्या नोंदीनुसार हळद विक्रीसाठी घेऊन आलेली २९५ वाहने हळद मार्केट यार्ड आवारात, तर १३५ वाहनांची मार्केट यार्डच्या गेटबाहेर रस्त्यावर रांग लागली होती. या वाहनांतील हळद मोजमापासाठी ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या वाहनांनाच मार्केट यार्डात प्रवेश दिला जाणार असल्याचे बाजार समितीने कळविले आहे. यासंदर्भात आडते, व्यापाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी