नाली खोदल्यामुळे वाहनचालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST2021-07-01T04:21:35+5:302021-07-01T04:21:35+5:30

रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागात मोकाट जनावरे रस्त्याच्या कडेला बसून ...

Trouble digging due to drainage | नाली खोदल्यामुळे वाहनचालकांना त्रास

नाली खोदल्यामुळे वाहनचालकांना त्रास

रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागात मोकाट जनावरे रस्त्याच्या कडेला बसून ठाण मांडत आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

वीजपुरवठा खंडित

हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, रिसाला चौक, कापड गल्ली आदी भागातील वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी वीज समस्येकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.

बसस्थानकातील गिट्टी उघडी

हिंगोली : शहरातील बसस्थानकातील गिट्टी उघडी पडली असल्यामुळे पावसाचे पाणी त्यात साचले जात आहे. या साचलेल्या पाण्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नवीन बसस्थानकाचे काम काही महिन्यांपासून रखडल्यामुळे प्रवाशांना तात्पुरत्या शेडमध्ये बसून बसची वाट पाहावी लागत आहे.

Web Title: Trouble digging due to drainage