एमपीएससी परीक्षेसाठी २० रोजी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST2021-03-13T04:54:38+5:302021-03-13T04:54:38+5:30
हिंगोलीतच नव्हे, तर राज्यभर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या तरुणांनी आंदोलन करून वारंवार परीक्षा रद्द होत असल्याने आक्राेश केला होता. ...

एमपीएससी परीक्षेसाठी २० रोजी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
हिंगोलीतच नव्हे, तर राज्यभर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या तरुणांनी आंदोलन करून वारंवार परीक्षा रद्द होत असल्याने आक्राेश केला होता. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुन्हा लांबणीवर न टाकता २१ रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे प्रशासनही कामाला लागले आहे. यापूर्वी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २० मार्च रोजी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहे.
जिल्ह्यात सहा केंद्रांवरून परीक्षा होणार असून १५६० परीक्षार्थिंनी नोंदणी केलेली आहे. पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने या परीक्षेची तयारी केलेल्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील दोन वर्षांपासून या परीक्षेची प्रतीक्षा होती. ती आता दूर झाल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच शासनाने वेळीच दखल घेतल्याने आमचे होणारे संभाव्य नुकसानही टळणार आहे. या परीक्षेची तयारी करताना मोठा आर्थिक खर्च पेलावा लागतो. शिवाय, सध्या कोरोनामुळे इतरही अनेक बाबींवरील खर्च वाढला आहे. तर ही परीक्षा द्यायची असल्याने घरीही जाता येत नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांची अडचण होत होती.