शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

आज राष्ट्रीय मतदार दिवस; मतदार जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:08 IST

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आहे. त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आहे. त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग नोंदवता यावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. भारतातील युवा मतदारांना सक्रिय राजकारणामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करण्याकरिता २०११ पासून भारत निवडणूक आयोगाने २५ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मूलभूत हक्क असल्याची जाणीव होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. 'राष्ट्रीय मतदार दिवस' निमित्त १८ वर्ष पूर्ण होत असलेल्या दिनांक १ जानेवारी, २०१९ च्या अर्हता दिनाकांवर १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक व युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत नाव नोंदविले नाही, अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत दिले जाते.१ जानेवारी, २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार हिंगोली जिल्ह्यात तीन मतदार संघामध्ये एकूण ८ लाख ७४ हजार ३१४ मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार ४ लाख १५ हजार ४६३ तर पुरुष मतदार ४ लाख ५८ हजार ८५० आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी नाव नोंदविले नाही त्यांनी नावे नोंदवावीत, असे आवाहन केले.जिल्ह्यात १ जानेवारी, २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०१८ अंतर्गत ३ आॅक्टोबर २०१७ ते १ सप्टेंबर, २०१८ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. एकूण ५७ हजार ४ दावे व हरकती प्राप्त होत्या. त्यापैकी ५६ हजार ४४१ निकाली काढले. नव्याने नोंदणी झालेल्या २५ हजार ४०२ तसेच नोंदीतील दुरूस्ती केलेल्या १२ हजार ९२४ एकूण ३८ हजार ३२६ मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवस २५ जानेवारी रोजी भारत निवडणूक आयोगाने नव्यानेच जारी केलेले लघु आकाराचे प्लॅस्टिक मतदार ओळखपत्राचे वाटप संबंधित मतदान केंद्राच्या ठिकाणी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत केले जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSocialसामाजिक