आज मल्लिनाथांचा रथोत्सव व मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:24 IST2018-12-19T00:24:22+5:302018-12-19T00:24:48+5:30
देशातील एकमेव असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भगवान मल्लिनाथ अतिशय क्षेत्री १७ डिसेंबरपासून भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आहे.

आज मल्लिनाथांचा रथोत्सव व मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : देशातील एकमेव असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भगवान मल्लिनाथ अतिशय क्षेत्री १७ डिसेंबरपासून भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. आज रोजी भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यानिमित्त रथोत्सव आणि भव्य मिरवणूक निघणार आहे. या शिवाय दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या जन्मोत्सवानिमित्त शिरडशहापूर येथे उत्साहाचे वातावरण पसरले असून, परभणी, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यातील जैन श्रावक, श्राविका यांची भगवान मल्लिनाथाच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. देशातील एकमेव अतिशय क्षेत्राच्या ठिकाणी जैन समाजबांधवांची मोठी उपस्थिती होत असून, सतत ३ दिवसांच्या या कार्यक्रमात दररोज सकाळी अभिषेक, शांती विधान पूजा, रात्री भजनी, शास्त्र सांस्कृतिक कार्यक्रम व पूजा होत आहे. बुधवारी होणाºया रथोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी होत असून यंदा गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त जैन श्रावक, श्राविका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष तथा जैन समाज बांधव व विश्वस्त कमिटीने केले.